संपादक-१९९२ - लेख सूची

संपादकीय

आजच्या संपादकीयाचे स्वरूप वेगळे आहे. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी आमच्या सल्लागार मंडळाच्या एक सभासद डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या धर्मान्तराच्या निमित्तानेआम्हाला पाठविलेल्या पत्रामुळे काही खुलासा करण्यासाठी हे आम्ही लिहीत आहोत.आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक सुरू झाल्याला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील. ह्या अवधीत आम्हाला महाराष्ट्रातील विचारी वाचकांकडून पुष्कळच प्रोत्साहन मिळाले आहे. ह्या मासिकात कोणते विषय …

संपादकीय २ – लोकसंख्यावाढ आणि कुळकर्णी सामितीचा अहवाल

महाराष्ट्र सरकारने लोकसंख्या व कुटुंबनियोजन कार्यक्रम यांच्या स्थितीची पाहणी करण्याकरिता नेमलेल्या कुळकर्णी समितीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. सरकारची आणि लोकांचीही झोप खाडकन उतरावी असे त्या अहवालाचे स्वरूप आहे. गेल्या २५-३० वर्षांत कुटुंबनियोजनाचा जो कार्यक्रम देशात चालू आहे त्याला लोकसंख्यावाढीला आळा घालण्याच्या कामात प्रचंड अपयश आले आहे हे त्यातून स्पष्ट होते. १९७१ ते १९८१ या …

पत्रव्यवहार

समतावादी कुटुंब! संपादक आजचा सुधारक यांस, ऑक्टो. ९२ च्या ‘आजचा सुधारक’मध्ये ‘विवाह आणि नीती-आमची भूमिका’ या संपादकीयात समतावादी कुटुंबाची केलेली तरफदारी केवळ भयानक आहे. समतावादी कुटूंब कोणाला नको आहे? प्रत्येक गृहस्थाला व गृहिणीला ते हवेसे वाटते. ते सहजी होणारे नाही हे खरे, पण प्रयत्नसाध्य तर आहेच. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ह्या व्यवहार्य तत्त्वालाही …

पत्रव्यवहार

प्रा. काशीकर ज्या स्टीफन हॉकिंगचे संदर्भ देतात त्या (आजचा सुधारक, मे-जून ९२) प्रोफेसर हॉकिंग यांचेबद्दल थोडी अधिक माहिती वाचकांना नसल्यास करून द्यावीशी वाटते. डॉ. स्टीफन हॉकिंग (वय वर्षे ५०) हे केंब्रिज विद्यापीठात थिऑरेटिकल फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड व नंतर केंब्रिज विद्यापीठात झाले व वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी १९६६ मध्ये “Universe could have …

वाचक मेळावा

मुळात ‘ नवा सुधारक’ या नावाने सुरू झालेले आमचे हे मासिक किती दिवस चालेल याची खात्री नव्हती. ‘सर्वारम्भास्तण्डुलाः प्रस्थमूलाः’ हे खरे आहे. पण नुसती तांदुळाची सोय असली तरी अशी कार्ये शेवटाला जात नाहीत. लोकाश्रय नसेल तर सारे व्यर्थ. ह्या भीतीमुळे सुरुवातीला चालकांना ‘आजीव वर्गणीदार’ ही पद्धत जाहीर करायचादेखील संकोच वाटला ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर …

संपादकीय

आजचा सुधारकाचा हा तिसर्‍या वर्षाचा पहिला अंक. म्हणजे आजचा सुधारक आता दोन वर्षाचा झाला. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तो जन्मला तेव्हा तो किती काळ तग धरू शकेल अशी शंका आम्हाला होती. याचे कारण त्याला वाचकांचा प्रतिसाद कितपत मिळेल याविषयीची साशंकता हे जसे होते, तसेच वाचकांचे विचारप्रवर्तन करील आणि तरी त्यांनी स्वीकार्य वाटेल असे साहित्य आपण किती …